Google Ad
Editor Choice

जाणून घ्या दसऱ्याच्या पूजेचा मुहूर्त … पद्धत आणि महत्त्व

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑक्टोबर) : शारदीय नवरात्री संपल्यानंतर १० व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो आणि या वेळी हिंदू दिनदर्शिकेनुसार, या वर्षीचा दसऱ्याचा सण अर्थात विजया दशमी १५ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.

Google Ad

धार्मिक कथांनुसार, या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला आणि या दिवशी मा दुर्गाने महिषासुराचा वध केला. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात कारण या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय होता.

▶️दसऱ्याची तारीख
हिंदू दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी तारीख १४ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६.५२ वाजता १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.२ पर्यंत राहील.

▶️दसरा पूजेसाठी शुभ मुहुर्त
दसरा अर्थात विजयादशमी या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी आहे. शुभ मुहूर्त सकाळी १.३८ ते दुपारी २.२४ पर्यंत असेल. या दरम्यान तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता.

विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.

आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. मात्र या दंतकथा असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या असे म्हटले जाते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!