महाराष्ट्र 14 न्यूज (दि.१४ऑक्टोबर) : दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी जुन्नर नगर परिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर & रिसर्च सेंटर चिंचवड पुणे, या हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांच्या करिता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात रत्रीरोग तपासणी, कर्करोग, कान नाक घसा, हिमोग्लोबीन, शुगर बी. पी. तपासणी करण्यात आली. तसेच कर्करोग जनजागृती अभियान अंतर्गत उपस्थित महिलांना ऋतुजा गोरडे यांनी मार्गदर्शन केले.

आज झालेल्या या शिबिरात एकुण दोनशे महिलांची तपासणी करण्यात आली, सदर शिबिराला संस्थेचे अध्यक्ष सहदेव गोळे, सचिव अंबादास बेळसांगविकर, खजिनदार तानाजी कसबे, संचालक डॉ बीना राजन, सरिता गोळे, सपना सारिका कसबे, डॉ. सारिका शिला वैराट, सुमित्रा गवारी, अशितोष शिरोळिकर, रविंद्र बोरुडे आदि उपस्थित होते.
106 Comments