Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे व अनधिकृत फ्लेक्स धारकांचे धाबे दणाणले!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ ऑक्टोबर : पिंपरी चिंचवड शहर हे सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून आयुक्त राजेश पाटील याच्या आदेशाने ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 9 ऑक्टोबर रोजी थेरगाव परिसरातील काळेवाडी फाटा ते संतोष मंगल कार्यालय ते वाकड पोलिस चौकी , गुजरनगर , १६ नंबर बस स्टॉप ,पवार नगर या परिसरातील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या विक्रेत्या वर व अनधिकृत फ्लेक्स वर मोठी कारवाई करण्यात आली .

अतिक्रमण विभागाने अचानक थाड घातल्याने रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यवसायीकांची चांगलीच धांदल उडाली तर अनधिकृत फ्लेक्स धारकांचे धाबे दणाणले आहेत . थेरगाव महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व ग क्षेत्रीय कार्यालय अधिकारी रविकिरण घोडके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Google Ad

ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कारवाई करत अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य १३० बोर्ड , ६ प्लास्टिक , ५ प्लास्टिक स्ट्रल ५ प्लास्टीक बाहुली , 9 लोखंडी स्टैन्ड ३२ फुटपाथ बोर्ड २ लोखंडी रॉड , १२ साडी , ३ वजन काटा , २ खुर्ची , सिलेंडर में लोखंडी पायरी २ हातगाडीवरील स्टील २१ पन्चर हत्यार , २ प्लास्टीक बादली , ५ डस्टर , २ चिनी माती भांडी २ जाहिरात बोर्ड पिंपरी चिंचवड शहरात विनापरवाना पलेक्स बोर्ड लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . शासकीय इमारती , विजेचे खांब फुटपाथ तसेच झाडांवर पालिकेची परवानगी न घेता मोठमोठे फ्लेक्स लावले जात असल्याने शहराचे रूप बकाल होऊ लागले आहे.

यांसह पदपथावर अतिक्रमण केलेल्या भाजी गाड्या कपडे व चपलाची दुकाने फळांची दुकाने , चहाचे हातगाड्या वडापावची दुकाने दुकानांसमोर अतिक्रमण करून व्यवसायिकांनी ठेवलेले साहित्य या कारवाईत जप्त करण्यात या कारवाई दरम्यान काही ठिकाणी विक्रेत्यांनी अतिक्रमणच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला . दरम्यान , सर्वांचा विरोध झुगारून अतिक्रमण विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवली . कारवाईच्या धास्तीने अनेकांनी कारवाई पूर्वीच आपला गाशा गुंडाळला होता.

या कारवाईत अनेक पदपथ तसेच अनधिकृत फ्लेक्स अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत . नागरिकांनी स्वतः सतर्क होत आपला परिसर आणि आपल शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे . यापुढेही अतिक्रमण कारवाई नियमित सुरू राहणार आहे . अशी माहिती ग क्षेत्रीय कार्यालय अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!