Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधणे, त्यांची तपासणी आणि उपचार याकरीता सीएसआर अंतर्गत बजाज यांचेमार्फत मोबाईल मेडिकल युनिट (व्हॅन) उपलब्ध

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ ऑक्टोबर २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधणे, त्यांची तपासणी आणि उपचार याकरीता सीएसआर अंतर्गत बजाज यांचेमार्फत मोबाईल मेडिकल युनिट (व्हॅन) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधून, त्वरीत तपासणी व उपचाराकरीता NCD कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे.

सदरकामी सीएसआर अंतर्गत बजाज यांचेमार्फत व्हॅन उपलब्ध होणार आहे. आज दि.०२ ऑक्टोबर, २०२१ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त व्हॅनमार्फत NCD कॅम्प राबविणेकामीचा शुभारंभ मा.महापौर यांचे अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सांगवी रुग्णालय, जुनी सांगवी-२७. येथे सकाळी १०.०० वाजता करण्यात आला . सदर व्हॉनचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये “आजादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत महानगरपालिककेच्या विविध ठिकाणी NCD कॅम्प (असंसर्गजन्य आजार तपासणी शिबीर) आयोजित करण्यात आलेले आहेत. सदर मोबाईल मेडिकल युनिट (व्हॅन) याची याकामी मदत होणार आहे.

Google Ad

सदर कार्यक्रमास बाजाज कंपनीतर्फे व्हॅन सुपुर्द करतेसमयी सीएसआर सल्लागार सी.पी. त्रिपाठी, व्हीपी सीएसआर पंकज वल्लभ, सीएसआर गटप्रमुख व सीएसआर फिनसर्व अजय साठे, झोनल हेड लीना राजन, सहायक व्यवस्थापक बजाज संगिता वाळके, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.विजया आंबेडकर, पीसीएमसीचे सीएसआर समयन्वयक विजय वावरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.वर्षा डांगे यांनी केले तर आभार डॉ.पवन साळवे यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!