महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : पाणी पुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने कळविण्यात आले आहे की, आज दि.०७/०६/२०२१ रोजी रावेत येथील टप्पा १ पंप हाऊस मधील valve फुटल्यामुळे ( burst) पंप हाऊस मध्ये पाणी झालेले आहे . Valve बदलण्याचे काम सूरु केले आहे . त्यामुळे अचानक shut dawn घ्यावा लागतोय . सर्व इलेक्ट्रिक पॅनेल मध्ये पाणी गेल्यामुळे सर्व पॅनल पूर्णपणे dry केल्याशिवाय पंप चालू करता येत नाहीत . काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
त्यामुळे आज संपुर्ण शहरात सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. आज रात्रि पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील.
तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे सह शहर अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी कळविले आहे.
7 Comments