Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pimpri Chinchwad

CRIME : थेरगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून एकाचा खून … वाकड पोलिसांनी तिघा आरोपींचा तातडीने शोध घेऊन केली अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव भागातील सोळा नंबर येथे रविवारी (दि.०६जून) रात्री जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून तीन जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करीत खून केला. यात पंकज धोत्रे ( रा . थेरगाव,पिंपरी-चिंचवड ) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून त्याच्यावर देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे .

यामध्ये तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, यात प्रथमेश शिंदे, वैभव गायकवाड, आणि मंथन चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मयत पंकज धोत्रे आणि आरोपी याच्यात पूर्वी भांडण झाले होते . या भांडणाचा राग मनात धरून आरोपी गेल्या दोन – तीन दिवसांपासून पंकज याचा शोध घेत होते .

Google Ad

रविवारी रात्रीच्या सुमारास थेरगाव येथील सोळा नंबर बसस्टॉपयेथे पंकज दिसला . या वेळी या तिघांनीही पंकज याच्यावर कोयत्याने सपासप वार केले . यामध्ये पंकज हा जागीच गंभीर जखमी झाला . त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दखल केले . मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पंकज धोत्रे चा मृत्यू झाला . वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

37 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!