Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मधील निळू फुले नाट्यगृहात महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : सोमवार दिनांक ७ जून २०२१ पासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथील निळु फुले नाट्यगृहात नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या तसेच जेष्ठांच्या सोयीच्या दृष्टीने कमीत कमी अंतरावर जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी येथील केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्या उपस्थितीत हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, नगरसेविका माधवी राजापुरे,नगरसेविका सीमा चौगुले उपस्थित होते.

सांगवी विभाग ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील लसीकरण केंद्रावर सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांपासून लस देण्यास सुरुवात केली. यावेळी वैद्यकीय विभागातील डॉ. किशोरकुमार हांडे, डॉ. मृणाल राजगुरू परिचारिका अंजली नेवसे, रुपाली घुले, अर्चना डोईफोडे, अश्विनी गुगले, आशा सेविका रंजना जाधव यांनी लसीकरण करण्यात सहभाग घेतला. आज दिवसभरात ४५ वर्षापुढील १०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

Google Ad

महापौर माई ढोरे म्हणाल्या पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ही समाधानकारक बाब असली तरी सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना विषाणुस प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझर तसेच हात स्वच्छ साबणाने धुणे आवश्यक आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार पिंपळे गुरव, काटेपुरम, सांगवी आदी भागातील नागरिकांना कोविड १९ लसीकरणाची सुविधा मिळावी यासाठी हे नवीन लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाकडे मागणीच्या तुलनेत लस साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेत अडथळा निर्माण होत आहे. मात्र, नागरिकांनी संयम ठेवावा. नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण आणखी सुलभ व्हावे यासाठी येथील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून आजपासून नियमितपणे याठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे, असे माजी नगरसेवक ‘शंकर जगताप’ यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

69 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!