Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली ऑनलाईन …दिला, मागील वर्षी पेक्षा १% अधिक लाभांश!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाचे पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने गुरुवार दिनांक २७/५/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या शुभम गॅलेरिया पिपरी स्टेशन येथिल कार्यालयात शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शना खाली व संस्थेच्या चेअरमन सीमा अनिल सुकाळे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली .

यावर्षी संस्थेने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व सभासदांची आर्थिक अडचण लक्षात घेता सभासदांचा लाभांश वेळेते जमा करण्याचे धोरण स्विकारुन पुर्ण केले आहे . दि . १३/५/२०२१ चे दैनिक लोकमत मध्ये सभेची नोटीस प्रसिध्द केली आहे . सदरची वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाने निर्गमित केलेनुसार सुरक्षित अंतर पाळून , मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे आज संस्थेच्या कार्यालयात मा.अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनरान झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या चेअरमन – सौ . सीमा अनिल सुकाळे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.

Google Ad

या सभेला बहुतांश सभासद ऑन लाईन उपस्थित झाल्यावर मा . अध्यक्ष यांनी वार्षिक सभेचे सर्व विषय वाचून दाखविण्यात आले या सर्व विषयांना सभासदान कडून बहुमताने मंजुरी मिळाली आहे . यामध्ये सभासदांना मागील वर्षापेक्षा १ % रक्कम अधिक दराने म्हणजेच १४ % दराप्रमाणे लाभांश मंजुर करणेत आला .

तसेच सभासदांना यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांना भेट वस्तू देण्याचे संचालक मंडळाने निश्चित केले आहे . तसेच सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष सभासदांना रु . ५००० / – बक्षिस म्हणून अदा करण्यात आली आहे . पिपरी चिंचवड मनपा कर्मचाऱ्यांन प्रमाणे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या आयोगानुसार सेवाउपदान व १०,२०,३० वर्षाचा लाभ लागू करण्यात आला आहे .

यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्री दत्तात्रय ढगे , सेक्रेटरी श्री मुकुंद वाखारे , खजिनदार श्री महादेव बोत्रे , संचालिका मा . चारुश्लिा जोशी व संचालक श्री महाद्रंग वाघेरे , श्री संजय कुटे , श्री मनोज माछरे , श्री आबा गोरे श्री राजाराम चिंचवडे , श्री दिलीप गुंजाळ , श्री नथा मातेरे , श्री रमेश चोरघे , श्री यशवंत देसाई व श्री नंदकुमार घुले आदी उपस्थित होते . तसेच मा . सचिव श्री मुकुंद वाखारे यांनी सभेस ऑनलाईन उपस्थित राहिल्याबदद्ल सर्व सभासदाचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!