Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा शिक्षकांचा श्रमदानातून अनोखा उपक्रम …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७मे) : कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व काय आहे , हे आता संपूर्ण जगाला माहीत झाले आहे. याचे महत्त्व जाणून पिंपरी चिंचवड शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळातर्फे मंगळवार दिनांक १ जून रोजी महामंडळाच्या सर्व क्रीडा शिक्षकानी एकूण १०१ झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.

गेली वर्षभर covid-19 मुळे शाळा बंद आहेत. आॕनलाईन लेक्चरचे काम संभाळत, राहिलेल्या वेळेचा सदोपयोग म्हणुन शहरातील क्रीडा शिक्षकांनी महामंडळाच्या माध्यमातुन शहरात अन्नदान केले आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर झाडे लावण्याचा उपक्रम सर्व क्रीडा शिक्षकांनी हाती घेतला.

Google Ad

आज पर्यत विद्यार्थ्यांनी , अनेक संस्थानी व कंपन्यानी वृक्ष लागवड केली आहे. पंरतु पिपरी चिचवड शहरातील क्रीडा शिक्षकानी प्रथमच एकञ येऊन झाडे लावण्याकरिता महिनाभर सकाळी श्रमदान करून खड्डे खोदण्याचे काम केले आहे व गेले १० दिवस सामाजिक बांधिलकी जपत सायंकाळी अन्न दानाचे काम केले आहे.

महामंडाळाकडुन निसर्ग प्रेमी मंडळीना काही टिकाव व फावडे भेट देण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे झाडांना पाणी घालण्याकरिता ५० मीटर म्हणजेच १६० फूट हास्थी पाईप भेट देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन महामंडळयाचे अध्यक्ष फिरोज शेख व संचालक निवृत्ती काळभोर यांनी केले.

तसेच कार्यक्रमाचे नियोजन महामंडाळाचे सचिव महादेव फपाळ , सुजाता चव्हाण,किर्ती मोटे, राम मुदगळ, उमा काळे, विष्णूपंत पाटील संतोष म्हाञे , हर्षल कुलकर्णी, आशिष मालूसरे, अजंली वर्टी, अर्चना सावंत,हेमराज थापा, बाळासाहेब हेगडे, राजू माळी, ज्ञानेश्वरी लोखंडे, संपदा कुंजीर, मनोज काळे, लक्ष्मण सर, शारदा सस्ते, निळकंट कांबळे , राजेश प्रसाद, हर्षदा नळकांडे , सुनिल प्रसाद, गौरी उत्तरे, अभिषेक कदम, रामदास लांगी

राहूल देवकर, गणेश गोंडे, मुकेश बिराजे सुशिल जाधव, सागर रसाळ, स्वाती शिंदे , अमित पवार, प्रिया काब॔ळे मनोज ठाकरे, राजेश शर्मा, रोहीत थापा, निलराज माने, शिवराज घोडके, अमृता तमुचे, मधूरा कुलकर्णी, यांनी आणि सर्व क्रीडा शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान व श्रमदाना करिता खुप मेहणत घेतली आहे. सर्व सहभागी क्रीडा शिक्षकांचे महामंडळाच्यावतीने खुप खुप धन्यवाद!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

82 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!