Google Ad
Editor Choice Pune

आय.टी.नगरी हिंजवडी मध्ये नवीन लसीकरण केंद्र सुरू करावे … ग्रामपंचायत सदस्य ‘विक्रम साखरे’ यांची जिल्हाधिकऱ्यांकडे मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : आयटी नगरी असलेल्या हिंजवडी परिसरातील आजची वाढलेली लोकसंख्या पाहता येथेच नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी हिंजवडीचे ग्रामपंचायत सदस्य विक्रम वसंत साखरे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी मा डॉ श्री राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या आयटीनगरी हिंजवडीत अनेक मोठ मोठे गृहप्रकल्प उभारले गेले असून येथे नागरीवस्तीची संख्याही मोठी आहे. तरी ग्रामस्थांसह सर्वच नागरीकांना लसीकरणाची स्थानिक पातळीवर सोय झाली तर होणारी हेळसांड वाचेल. तसेच एकाच ठिकाणी गर्दी होण्याऐवजी विकेंद्रीकरण झाले तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोकाही टाळणे शक्य होईल म्हणून हिंजवडीकरांसाठी वेगळे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी विक्रम साखरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!