Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१४ मे रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ या ठिकाणी मिळणार कोव्हॅक्सीनचा ‘ दुसरा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .१३ / ०५ / २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका लसीकरण केंद्रावर आज ६६५६ लाभार्थीना लसीकरण करण्यात आले आहे . शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या दि .१४ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही .

फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोव्हॅक्सीनचा ‘ दुसरा डोस २५० च्या क्षमतेने लसीकरण सत्रे आयोजित करुन देण्याची कार्यवाही सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या

Google Ad

यमुनानगर रुग्णालय ,
तालेरा रुग्णालय ,
सावित्रीबाई फुले शाळा भोसरी
नवीन जिजामाता रुग्णालय
आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ
खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव
नवीन आकुर्डी रुग्णालय आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ

या लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे . तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!