Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : माझ्याकडून पैसे घेते आणि इतर लोकांसोबत बोलते … संतापलेल्या प्रियकरानं उगवला सूड

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यातील लोहगाव याठिकाणी एका शेतात महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यानंतर हातात कोणतेही पुरावे नसताना तातडीनं पावलं उचलत विमानतळ पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत आरोपी युवकाला जेरबंद केलं आहे. संबंधित आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिली असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

संबंधित 31 वर्षीय आरोपी युवकाचं नाव संतोष महादेव राठोड असून त्याचे संबंधित मृत महिलेशी प्रेमसंबंध होते. लोहगाव परिसरात राहणारा आरोपी सोमवारी रात्री आपल्या प्रेयसीकडे जेवणासाठी गेला होता. यावेळी जेवण झाल्यानंतर तो आपल्या प्रेयसीला घेऊन बाहेर फिरायला गेला. निर्जनस्थळी गेल्यानंतर त्याने संधी साधून प्रेयसीचा गळा दाबला. यामुळे प्रेयसी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी प्रियकराने तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली.

Google Ad

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर आरोपी संतोष राठोड याचे मागील काही काळापासून मृत महिलेशी प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात आरोपीनं तिला अनेकदा पैशांची आणि इतर मदत केली होती. पण आपल्याकडून पैसे आणि इतर मदत घेऊन ती दुसऱ्या लोकांसोबतही बोलते. याचा राग आरोपी प्रियकराला होता. हाच राग मनात धरून त्यानं प्रेयसीची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे.

सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर आरोपी युवक तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. जीवे मारण्याच्या हिशोबाने आलेल्या प्रियकराने तिचा सुरुवातीला गळा दाबला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने शेतातील दगडाने तिच्या डोक्यात वार केला. या दुर्दैवी हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला प्रियकराला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!