Google Ad
Editor Choice

माझ्या विजयात भाजपचा ६० ते ७० टक्के वाटा, ज्यांच्या मतावर निवडून आलो, त्यांचा सन्मान ठेवण्याची माझी भूमिका … खासदार श्रीरंग बारणे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जुलै) : २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने पिंपरी -चिंचवड, देहूरोड येथून आलेल्या शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये आम्हीच खरे शिवसैनिक असल्याचा विश्वास त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

तर एकीकडे मावळ लोकसभेचे बंडखोर खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात आले, त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी पुणे विमानतळावर हार फुलांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

Google Ad

यावेळी बोलताना, खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी माझ्या प्रचारात भाग घेतला होता. त्यामुळे मी २०१९ लाच त्यांच्याशी जुळवून घेतले आहे. माझ्या विजयात भाजपचा ६० ते ७० टक्के वाटा आहे. मी भाजप पदाधिकारी दुखावू दिले नाहीत. ज्यांच्या मतावर निवडून आलो. त्यांचा सन्मान ठेवण्याची माझी भूमिका राहिली आहे. त्यामुळे पुढचा विचार करून भविष्यात आम्ही सन्मानाने भाजप सोबत राहणार आहोत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!