Google Ad
Editor Choice

पुणे पोलिसांकडून गणपती मंडळांसाठी नियमावली जाहीर … अशी असेल गणेशोत्सवाची आचारसंहिता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जुलै) : महाराष्ट्रातील कोरोनाचे सावट दुर झाल्याने, यंदा गणेशोत्सव जोमात साजरा केला जाणार आहे. मात्र, हा आनंद साजरा करीत असतांना, नागरीकांना काही अटी-शर्तींचे पालन करायचे आहे. यासंमदर्भात काही नियमावली पुणे पोलिसांकडून जाहिर करण्यात आल्या आहे.

गणेशोत्सव २०२२ पुणे पोलीस गणपती मंडळासाठी आचारसंहिता दिनांक ३१/०८/२०२२ ते दिनांक ० ९ / ० ९ / २०२२ या काळात गणेशोत्सव साजरा होणार आहे .

Google Ad

▶️ अशी आहे गणपती मंडळाकरीता आचारसंहिता :-

या संपूर्ण उत्सवाचे काळात शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे आमच्यावर आहे , हीच नैतिक जबाबदारी आपणांवरही आहे , या संपूर्ण काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबद्दल आपले सहकार्यासाठी आम्ही आपणांस आवाहन करीत आहोत .

श्री मुर्ती स्थापना व आरास संदर्भात गणेश मंडळाने आपले मंडळ धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करुन घ्यावे .

गणपती स्थापने पूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक आहे .

पोलीस परवाना अर्ज स्विकृती त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचे अधिकारीतेत एक खिडकी योजना मार्फत स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . वर्गणी सक्तीने अगर वाहने अडवून जमा करु नये .

गणपती मंडप सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वानुसार रस्त्याचा १/३ भाग उपयोगात आणून बांधावा . मंडप बांधण्यापूर्वी गणेशोत्सव परवाना प्राप्त करावा .

मंडप व गणपती स्थापनेचे आसन मजबुत असावे . तसेच श्री मुर्तीचे पाऊस व आगीपासून संरक्षणाची काळजी घ्यावी.

मुर्तीची स्थापना योग्य उंचीवर असावी . गणेश मुर्तीची उंची मर्यादीत असावी , गणेश मुर्ती पारंपारिक असल्यास देखाव्याच्या उंचीची मर्यादा मर्यादीत असावी .

कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी . वाळुच्या बादल्या भरून ठेवाव्यात .

सजावटीमध्ये हॅलोजन सारखे प्रखर दिवे लावण्याचे टाळावेत . प्रेक्षक अथवा सुरक्षा रक्षकांच्या डोळयांवर प्रखर प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी .

मंडपातील रोषणाई व विद्युतीकरणाचे काम प्रमाणपत्र असलेल्या तज्ञ वायरमनकडून करुन घ्यावे . तसेच विद्युत मंडळाचे अधिका – यांकडून तपासणी करुन घ्यावी . विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास जनरेटर , बॅट या उपलब्ध ठेवाव्यात .

उत्सवामध्ये व मिरवणुकीमध्ये करण्यात येणा – या देखाव्याची माहिती अगोदर संबंधित ठाण्यात कळविणे आवश्यक आहे .

वादग्रस्त ठरतील अशा विषयावर कार्यक्रम अगर देखावे / सजावटी सादर करु नयेत . संपूर्ण उत्सवाचे काळात मंडळाच्या ठिकाणी होणा – या कार्यक्रमाची यादी व रुपरेषा पोलीसांना आगाऊ कळवावी .

ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटी नुसार करावा तसेच ध्वनिक्षेपकाची मर्यादा २ ओहम व ५००० आर . एम . एस . वॅट पेक्षा जास्त क्षमतेची असू नये.

श्री मुर्ती स्थापना व आरास संदर्भात गणेश मंडळाने आपले मंडळ, धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करुन घ्यावी. -गणपती स्थापने पूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक आहे . -वर्गणी सक्तीने अगर वाहने अडवून जमा करु नये .-गणपती मंडप, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रस्त्याचा १/३ भाग उपयोगात आणून बांधावा . -मंडप बांधण्यापूर्वी गणेशोत्सव परवाना प्राप्त करावा . मंडप व गणपती स्थापनेचे आसन मजबुत असावे . तसेच श्रींच्या मंडपाची पाऊस व आगीपासून संरक्षण होईल, याची काळजी घ्यावी. -सजावटीमध्ये हॅलोजन सारखे प्रखर दिवे लावण्याचे टाळावेत . प्रेक्षक अथवा सुरक्षा रक्षकांच्या डोळयांवर प्रखर प्रकाश पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!