Google Ad
Editor Choice

दक्षिण आफ्रिकेतून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, … ओमिक्रॉनचीही चाचणी, पिंपरीसह 6 मेट्रो शहरात रुग्ण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ डिसेंबर) : ओमिक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रात मुंबईसह पुणे आणि इतर शहरं सज्ज होतायत. शाळांचा निर्णय बहुतांश ठिकाणी (महापालिका क्षेत्रात) पुढे ढकलण्यात आलाय. दरम्यान गेल्या काही काळात परदेशातून विशेषत: ओमिक्रॉन संक्रमित देशातून जे प्रवाशी महाराष्ट्रात आले त्यांचं ट्रेसिंग सुरु आहे.

त्यात 15 दिवसांपूर्वी मुंबईत 466 जण आलेत. पैकी 100 जण हे मुंबईतील आहेत. ह्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जातेय. याच चाचणीत डोंबिवलीतल्या रुग्णाचा शोध लागला. संबंधीत रुग्ण हा 40 वर्षांचा आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेचाच रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Google Ad

दक्षिण आफ्रिका आणि युरोपात ओमिक्रॉनच्या केसेस वाढत असतानाच आणि त्यामुळे महाराष्ट्रासह जगभरात भीती वाटत असतानाच राज्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. विशेष म्हणजे हे सहाही नवे रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले आहेत. बरं हे सर्व कोरोनाग्रस्त एकाच शहरातले नाहीत.

तर महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या शहरात आहेत. त्यात मुंबई, पुणे, भाईंदर, डोंबिवली आणि पिंपरीचा समावेश आहे. त्यामुळेच त्या त्या शहरात सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जातंय. प्रशासनही अलर्टवर आहे. पण हे सहाही रुग्ण हे ओमिक्रॉन विषाणूने संक्रमित आहेत की नाही याचा चाचणी रिपोर्ट येणं अजून बाकी आहे.

दक्षिण आफ्रिकेतून एक जण हा डोंबिवलीत आला आणि त्यानंतर मुंबईलाही हादरले बसले. त्या संबंधीत प्रवाशाची चाचणी झाली. त्याच्या कुटुंबियाचीही झाली. त्यात तो प्रवाशी पॉझिटिव्ह आला. सुदैवानं कुटुंबिय मात्र नेगेटीव्ह निघाले. पण त्याच दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले इतर पाच जण मात्र पॉझिटिव्ह निघालेत.

त्यात मुंबई, पुणे, भाईंदरमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर पिंपरीच्या दोघा जणांचा समावेश आहे. दरम्यान ह्या सहा जणांना ओमिक्रॉनची लागण झालीय का नाही त्याच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आलेत. जिनोम सिक्वेन्सिंगही करण्यात आलीय. त्याचा रिपोर्ट येणं मात्र बाकी आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!