Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पिंपळे गुरव, नवीसांगवी शाखेतर्फे परिवहन मंडळाच्या (एस टी) च्या आंदोलनला पाठिंबा म्हणून सह्यांची मोहिम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पिंपळे गुरव, नवीसांगवी शाखेतर्फे
परिवहन मंडळाच्या (एस टी) च्या आंदोलनला पाठिंबा म्हणून सह्यांची मोहिम राबविण्यात आली, यामध्ये परिवहन मंडळाची राज्य सरकारमध्ये समाविष्ट करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली, सदर मागणी मान्य करत नाही तोपर्यंत कोणत्या न कोणत्या मार्गाने राज्य सरकार विरोधात आंदोलन मनसे करतच राहणार असे सांगण्यात आले.

या सह्यांच्या मोहिमेत शाखाध्यक्ष प्रदीप गायकवाड, राजू सावळे, सुरेश सकट, भरत क्षेत्रे, दत्तू हातागळे,संजय जगधने, साईराज, राम कमरे, शेषराव जगधने, सावळाराम जगधने, देवदास खुजे, ववले, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते, नागरिकांनी ह्या मोहीमेत मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदविल्याचे यावेळी पहायला मिळाले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!