Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दापोडीतील स्वीकृत नगरसेवक अनिकेत काटे भागवतायेत गरीब गरजूंची भूक … १५ दिवस अन्नछत्र उभारून स्वतः देतायेत सेवा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७मे) : दळणवळण बंदीमुळे शहरातील निराधार असलेल्या आणि रस्त्यावर रहाणार्‍या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक घडी कोलमडली असून अनेकांच्या हाताला काम नसल्यानं दोन वेळच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत निर्माण झालीय. गरिबांच्या या दुःखाची जाणीव समोर दिसत असताना, या संकटाच्या पार्श्वभूमीवर दापोडीतील स्वीकृत नगरसेवक ‘अनिकेत राजेंद्र काटे’ हे गेल्या १५ दिवसांपासून परिसरातील वेगवेगळ्या भागात गरजूंना जेवण पुरवत आहे. विशेष म्हणजे हा सर्व स्वयंपाक महिला बनवत असल्याने त्यांनासुद्धा रोजगार मिळाला आहे.

प्रसिद्धीचा कोणताही गाजावाजा नकरता दापोडी परिसरातील गरजू गोरगरिबांची दखल घेत अनिकेत काटे हे स्वतः नाका कामगार असो वा इतर हातावर पोट असणार कष्टकरी असो, त्यांची ते सेवा करत आहेत. त्यांच्या या अन्नदानामुळे, अशा सर्व लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कठीण काळात उद्योजकानी मदतीचा हात पुढे केल्याने सर्वसामान्य गरिबांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत आहे.

Google Ad

कोरोना या संसग॔जन्य महामारीच्या बिकट काळात आपणा सर्वानी आपल्या जवळचे स्नेही,आप्तेष्ट, नातेवाईक मित्र मंडळी यांचे प्राण गमावले आहेत अशा सर्वाना श्रध्दांजली रूपाने वाढत्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोना रूग्ण तसेच समाजातील तळागळातील गरीब व होतकरू नागरिकांना आपल्या परीने सव॔तोपरीने मदत करण्यात यावी असे नम्र आवाहन अनिकेत काटे यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!