Google Ad
Editor Choice Technology

पिंपरी चिंचवड शहरातील व्हीएमडीचे काम प्रगतीपथावर … शहरामधील नागरिकांना मिळणार विविध सामाजिक आणि लोकोपयोगी विषयांवर संदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . २० ऑगस्ट २०२१) : शहरामधील नागरिकांना विविध सामाजिक आणि लोकोपयोगी विषयांवर संदेश प्रसारित करण्याकरिता पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि . च्या वतीने संपूर्ण शहरामध्ये एकूण ६० ठिकाणी ४.८ मिटर बाय २.८ मिटर इतक्या आकाराचे व्हीएमडी कार्यान्वित करणे प्रस्तावित आहे . त्यांपैकी ५५ ठिकाणी व्हीएमडीसाठी पायाभूत यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे . सदर व्हीएमडी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका , पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि . , विद्युत विभाग व तांत्रिक सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांचा सहभाग असतो .

तसेच यासाठी संबंधित यंत्रणेकडून विविध मान्यता घेणे आवश्यक असते . उभारणी करण्यात आलेल्या एकूण ५५ व्हीएमडीपैकी १५ व्हीएमडीच्या विद्युत पुरवठ्यासाठी अतिरिक्त विद्युत वितरण यंत्रणा ( अॅडिशनल पॉवर डीस्ट्रिब्युशन बॉक्स ) बसवण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीबरोबर ( एमएसईडीसीएल ) कामाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे . तसेच ६ ठिकाणी विद्युत पुरवठा जोडणीचे काम पूर्ण झाले असून पुढील संगणकीय तांत्रिक कामाची प्रक्रिया सुरू आहे . त्याचबरोबर ९ व्हीएमडीकरिता लागणाऱ्या विद्युत मिटर संदर्भात अर्ज करण्यात आलेले आहेत . सध्या २५ व्हीएमडींचे काम पूर्ण झाले असून उर्वरित व्हीएमडी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु आहे .

Google Ad

अनियमित दाबाने होणारा विद्युत पुरवठा आणि विद्युत पुरवठा खंडित होणे या समस्या दूर करण्यासाठी व्हीएमडी सोबत युपीएस बसविण्यात आले आहेत . विद्युत पुरवठा बंद असताना युपीएसच्या सहाय्याने व्हीएमडी अर्ध्या तासापर्यंत काम करतात . काही ठिकाणी व्हीएमडी अद्ययावत करण्यासाठी देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरु आहे . हे काम २० / ० ९ / २०२१ पर्यंत पूर्ण करून व्हीएमडी कार्यान्वित करण्यात येणार आहेत .

व्हीएमडीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक उपायांसंदर्भात जनजागृती अशा विषयांवर संदेश प्रसारित करण्यात आले असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे . भविष्यातही व्हीएमडीच्या माध्यमातून हे कार्य असेच चालू ठेवण्यात येईल . ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ४० व्हीएमडी कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!