Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात लहान मुलांना मोफत फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण करणेसाठी महापौरांच्या प्रभागातून सुरुवात करा … ‘प्रशांत शितोळे’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरात लहान मुलांना मोफत फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण करणेसाठी महापौरांच्या प्रभागातून सुरुवात करणेबाबतची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

सध्या पाऊस काळ चालू आहे. त्यातच गेली दीड वर्षे कोरोनाने थैमान घातले आहे आणि अशा या भयानक परिस्थिती मध्ये लहान मुलांमध्ये या आजाराने डोके वर काढले असल्याने सर्वच नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये फ्लूचे प्रमाण प्रचंड असून त्यामुळे लहान मुलांच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलांबद्दल काळजी वाटत असून कोरोनाची परिस्थिती आजही असल्याने अनेकांची मानसिकता भयावह अशी झाली आहे .

Google Ad

प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्यावतीने हिवताप, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू, फ्लू अशा आजारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महानगरपालिकेने शहरातील लहान मुलांचे दवाखाने, लहान मुलांचे डॉक्टर यांचेशी संपर्क साधून लहान मुलांच्या आजारावरील औषध किंवा वॅक्सिन देणे करिता तातडीने सुरुवात करावी. अगोदरच कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना जास्त धोकादायक असले बाबतच्या बातम्या येत असल्याने भीतीचे वातावरण आहे.

त्यामुळे फ्लू चे लक्षणसुद्धा ताप असल्याने जास्तच भीती लहान मुलांच्या पालकांमध्ये आहे. त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक लसीकरण होणे गरजेचे असून तातडीने महानगरपालिकेमार्फत लहान मुलांच्या फ्लू आजारावरील लसीकरण मोफत स्वरूपात चालू करावे. याकरिता महापौरांच्या सांगवी प्रभागातूनच तातडीने सुरुवात करावी अशी विनंती व मागणी प्रशांत शितोळे यांनी केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

24 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!