Google Ad
Editor Choice

सांगवी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) … यांना सत्तर हजार रुपयांची लाच घेताना पकडले … तर सहाय्यक फौजदाराने दिला गुंगारा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ डिसेंबर) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सांगवी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) हेमा सिद्धराम सोळूंके (वय २८) यांना सत्तर हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (ता.२) पकडण्यात आले.

त्यांच्यावतीने ही लाच घेणारे याच पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक (जमादार) अशोक बाळकृष्ण देसाई हे मात्र, एसीबी पथकाला धक्का मारून लाचेची रक्कम घेऊन दुचाकीवरून पळून गेले. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून सत्तर हजारावर या महिला पोलिस अधिकाऱ्याने तडजोड केली होती.

Google Ad

सांगवी पोलिस ठाण्यात यापूर्वीही लाच घेण्यात आली होती. त्याप्रकरणी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी लाचखोराला तडकाफडकी निलंबित केले होते. त्या मुळे आजच्या प्रकारातही पोलिस अधिकारी व कर्मचारी अशा दोघांविरुद्ध अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे. या पोलिस ठाण्याच्या प्रमुखाचीही या प्रकरणातून बदली होईल, अशी चर्चा आजच ऐकायला मिळाली.

या प्रकरणातील ४२ वर्षीय पुरुष तक्रारदाराविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात दोन अर्ज करण्यात आले होते. त्याची चौकशी महिला फौजदार सोळूंके यांच्याकडे देण्यात आली होती. त्यात तक्रारदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. नंतर सत्तर हजारावर तडजोड केली. मात्र, लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनिटकडे तक्रार केली. त्यांनी त्याची गेल्या महिन्यात २५ व २६ तारखेला पडताळणी केली.

त्यानंतर आज सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयाजवळ सापळा लावला. त्यावेळी सोळूंके यांच्यावतीने लाच घेताना देसाईला पकडण्यात आले. मात्र, तो कारवाई पथकाला धक्का मारून मोटारसायकलीवरून पळून गेला. त्यानंतर सोळूंकेंना ताब्यात घेण्यात आले. पुणे एसीबीच्या पोलिस उपअधिक्षक सीमा आडनाईक, निरीक्षक भारत साळूंखे, सहाय्यक फौजदार शेख, हवालदार नवनाथ वाळके, नाईक वैभव गिरीगोसावी, महिला पोलिस शिपाई पूजा पागिरे या पथकाने ही कारवाई केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!