Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेवक ‘शत्रुघ्न (बापू) काटे’ यांनी घेतली पिंपरी चिंचवड मनपामध्ये सेवा करणाऱ्या कोरोना योध्याची दखल … राखीव बेड ठेवण्याची केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील डी . वाय पाटील हॉस्पीटल मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलीसांसाठी सुसज्ज असा ३०बेडचा वार्ड तयार करण्यात आला असून तो काल दिनांक २३ एप्रील २०२१ पासून कार्यरत झाला आहे . या कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गाच्या सध्याच्या परिस्थीती मध्ये होणाऱ्या संसर्गाची भीती न बाळगता आपले पोलीस दल अहोरात्र काम करीत असल्याने व त्यांना संसर्गाची जास्त शक्यता असल्यामुळे मा . पोलीस आयक्त कृष्ण प्रकाश व अन्य सर्व अधिकारी तसेच डी वाय पाटील विदयापीठाचे कुलपती डॉ . पी . डी . पाटील यांचे संकल्पनेतुन हा अतिशय सुत्य व कौतुकास्पद व अत्यंत गरजेचा उपकम सुरू झालेला आहे .

जसे पोलीसदल सध्या अहोरात्र संसर्गाची भिती न बाळगता कार्यरत आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या सेवेत डॉक्टर, परिचारिका व इतर फ्रंटलाइन वर्कर देखील आज अहोरात्र आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता संसर्गाची तमा न बाळगता रुग्णांना सेवा देण्यात कार्यरत आहेत . या कोविड योदध्यांना तसेच त्यांचे कुटूंबियांना संसर्ग झाला अगर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यांना देखील प्राधान्याने व तातडीने उपचार मिळणे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा महानगरपालीकेने तात्काळ देणे आवश्यक आहे . परंतू आज मितीस या कोविड योदध्यांसाठी अशा प्रकारची तात्काळ उपचारासाठीची तरतुद नाही . या सर्व गोष्टीची दखल घेऊन नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांना ही सुविधा राखीव ठेवण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.

Google Ad

या निवेदनात नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे, की शहरातील पोलीसदलासाठी राखीव ठेवण्यात आलेला सुसज्ज वार्ड व त्याच्या उपाययोजनांच्या धर्तीवर महानगरपालिकेने देखील आपल्या सेवेतील कोविड योध्यांसाठी अशा प्रकाराची राखीव सुसज्ज वार्ड व विनाविलंब वैदयकीय सेवा मिळणेसाठी तरतुद तात्काळ करावी. यावेळी महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक शशिकांत कदम उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!