Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातल्या ई – कचऱ्याचे करायचे काय ? -सामान्य जनतेचा प्रश्न … काय म्हणतायेत, राष्ट्रवादीचे माधव धनवे-पाटील!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहारत अनेक समस्या आहेत त्यात पर्यावरणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरात अनेकजण उच्चशिक्षित आहेत, आयटी मध्ये कामाला आहेत. अनेकांकडे कॉम्पुटर आणि मोबाईल आहेत. पण काही कालांतराने ते बंद पडतात अशावेळी हा ई-कचरा कुठे जमा करायचा हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

त्यातच गणेशउत्सव सुरु आहे. हौशी मंडळींनी सजावटीसाठी जुन्या लाईटच्या माळा, त्याचे चार्जर, चोक, ड्राइव्हर इत्यादी वापरले तर त्यातले काही खराब झाले. त्यांचाही हा प्रश्न आहे की या खराब आणि न वापरता येणाऱ्या ई-कचऱ्याची विल्ल्हेवाट कशी लावायची?

Google Ad

एवढेच काय पण घरातली ट्यूब लाईट खराब झाली तर त्याचे काय करायचे हा प्रश्न कित्येक दिवस नागरिकांना पडलेला आहे. ई-कचरा साफ-सफाई करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी घटक असतो. ई-कचऱ्यामुळे कचरा डेपोमध्ये आगी लागण्याचा धोका असतो. काही सामाजिक संस्था ई-कचरा गोळा करण्याचे छोटे मोठे उपक्रम घेत असतात पण ते ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.
राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव धनवे-पाटील यांनी शहरातील निर्माण होणार ई-कचरा कुठे जमा करायचा, त्याची विल्ल्हेवाट कशी लावायची याबाबत प्रशासनाकडून योग्य ती पाऊले उचलली जावीत यासाठी नगरपालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांना निवेदन दिले.

त्या उपाय योजनांचा प्रचार प्रसार करावा ही विनंती केली.
तसेच प्रभाग १७ मध्ये अनेक उच्चशिक्षित लोक आहेत, ज्यांच्याकडे ई-कचरा तयार होतो म्हणून या भागात ई-कचरा गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी विनंती पर्यावरण विभाग प्रमुखांना करण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!