Google Ad
Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते रिक्षा व वाहन चालकांना मोफत गणवेश वाटप वर्षभरापासून कोरोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडले 

महाराष्ट्र 14 न्यूज,दिनांक १३ सप्टेंबर २०२१ – कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रिक्षा व वाहन चालक यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.मदतीचा हात म्हणून आज (दि.१३) चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सांगवी येथील बॅडमिंटन हॉल पी डब्ल्यू डी ग्राउंड येथे रिक्षा व वाहन चालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार जगताप म्हणाले,मागील वर्षभरापासून कोरोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये रिक्षाव्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता येत गेल्यानंतर रस्त्यावर रिक्षा धावू लागल्या. मात्र, ‘वर्क फॉर्म होम’ तसेच कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करणे टाळत असल्याने प्रवासी मिळेनासे झाले. त्यात बरेच दिवस सर्वसामान्यांसाठी लोकलसेवादेखील बंद असल्याने याचाही फटका रिक्षाचालकांना बसला होता. त्यामुळे दररोजच्या उत्पन्नामध्ये घट झाल्याने घरखर्च तसेच बँकेचा हप्ता भागवणे रिक्षाचालकांना अवघड झाले. कोरोना साथीला वर्ष झाले असून अद्यापही रिक्षाव्यवसाय पूर्णपणे रुळावर आलेला नाही.कोरोना काळात रिक्षाचालकांना गणवेश देण्याचे आश्वासन मी दिले होते  त्यामुळे आज त्यांना मोफत गणवेश वाटप देण्यात आले आहेत.भारतीय जनता पार्टी  नेहमी रिक्षा व वाहन चालकाच्या पाठीशी उभी आहे असेही ते म्हणाले.

Google Ad

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथिल केली जात आहे. रिक्षा चालकांना देखील सामाजिक अंतर आणि योग्य खबरदारी घेऊन प्रवासी वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन रिक्षाचालकांनी रिक्षा चालवावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी यावेळी केले.

यावेळी महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे, मा.विलास मडिगेरी मा.अध्यक्ष-स्थायी समिती,श्री.हर्षल ढोरे-नगरसदस्य, सौ.शारदा सोनवणे-नगरसदस्या, श्री.संकेत चोंधे, श्री.संतोष ढोरे, श्री.हिरेन सोनवणे, श्री.आप्पा ठाकर, श्री.धनंजय ढोरे, श्री.शुक्ला सर, श्री.विशाल कलाटे, श्री.दत्ता यनपुरे, श्री.कृष्णा भंडलकर, श्री.भुषण शिंदे, सौ.दर्शना कुभांरकर, श्री.गणेश काची इत्यादी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री.जवाहर ढोरे, सांगवी रिक्षा संघटने तर्फ श्री.शशिकांत कुभांर व श्री.सुनिल कुभांर यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नामदेव तळपे यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!