Google Ad
Editor Choice Maharashtra

नवरात्रीत परिधान करा ‘ या ‘ रंगांची वस्त्रे … पहा कोणत्या दिवशी आहे कोणता रंग!

महाराष्ट्र 14 न्यूज : शारदीय नवरात्र उत्सव शनिवार, १७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. मात्र या वर्षभरतील इतर सणांप्रमाणेच या सणावरही कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदाचा नवरात्र उत्सव सर्वाना घरीच साजरा करावा लागणार आहे. तरीही नवरात्रीच्या नऊ दिवसात भारतीय महिला वेगवेगळ्या नऊ रंगाचे पोशाख घालत असतात. नवरात्रीच्या वेळी आपल्या जीवनात त्या विशिष्ट रंगाचा समावेश करणे शुभ मानले जाते. पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत, प्रत्येक विशिष्ट रंग निश्चित केला आहे.

🔴पहिला दिवस – राखाडी
देवीच्या नवरात्रीचा पहिला दिवस. देवीचे पहिले रूप माता शैलपुत्री रूपातील आहे. या पहिल्या दिवशी राखाडी कपडे घातले जातात. राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीस व्यावहारिक आणि साधे बनण्यास प्रवृत्त करतो. आपल्या विशिष्ट शैलीत नवरात्र साजरा करणाऱरे या हलक्या रंगास प्राधान्य देतात.

Google Ad

🔴दुसरा दिवस – केशरी
नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणीच्या रूपाची पूजा केली जाते. या दिवशी केशरी रंगाचे कपडे घालावे. रविवारी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवी नवदुर्गाची पूजा केल्यास मन आनंही आणि उत्साही होते. हा रंग सकारात्मक उर्जा परावर्तीत करतो आणि मन उत्तेजित ठेवतो.

🔴तिसरा दिवस – पांढरा
नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी देवीच्या चंद्रघंटाच्या रूपाची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी पांढर्‍या रंगाचे कपडे घालावेत. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचे प्रतिक आहे. देवीची कृपा मिळण्यासाठी सोमवारी पांढर्‍या रंगाचे कपडे घाला. पांढरा रंग आत्म-शांती आणि सुरक्षिततेची भावना देतो.

🔴चौथा दिवस – लाल
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते. मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. लाल रंग उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. तर लाल रंगाची ओढणी किंवा साडी देवीला अर्पण करण्याची प्रथा आहे. हा रंग भक्तांना सामर्थ्य आणि चैतन्य प्रदान करतो.

🔴पाचवा दिवस – गडद निळा
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीच्या स्कंदमाता रूपाचे पूजन केले जाते. यंदाच्या नवरात्र उत्सवात पाचव्या दिवशी गडद निळ्या रंगाचे कपडे घालावेत. गडद निळ्या रंगाचा वापर केल्याने आपणास अतुलनीय आनंद मिळेल. निळा रंग समृद्धी आणि शांती दर्शवितो.

 

🔴सहावा दिवस – पिवळा
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते. यंदाच्या नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पिवळ्या रंगाची कपडे परिधान करावीत. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने नवरात्र उत्सवात माणसाचे मन आशावादी व प्रसन्न राहते. हा रंग उष्णतेचे प्रतीक आहे, जो एखाद्या व्यक्तीला दिवसभर आनंदी ठेवतो.

🔴सातवा दिवस – हिरवा
नवरात्रीच्या सातव्या दिवशी सप्तमीच्या देवीच्या कालरात्री स्वरूपाची पूजा केली जाते. सातवा दिवस हिरव्या रंगाला समर्पित आहे. हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. शुक्रवारी हिरवा रंग वापरुन शांतीसाठी देवीची प्रार्थना करावी. हिरवा रंग जीवनात एक नवीन सुरुवात दर्शवितो.

🔴आठवा दिवस – मोरपंखी
देवीचे आठवे रूप म्हणजे देवी महागौरीचे रूप आहे. यादिवशी मोरपंखी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. मोरपंखी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्त्व दर्शवितो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशिष्ट मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगांचे गुण (समृद्धी आणि नवीनता) मिळतात.

🔴नववा दिवस – जांभळा
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्रीची रुपाची पूजा केली जाते. हा दिवस जांभळ्या रंगाचा आहे. जांभळा रंग भव्यता आणि भव्य सौंदर्य प्रतिबिंबित करतो. नवदुर्गाच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरुन भाविकांना भरभराट आणि ऐश्वर्य प्राप्त होते. म्हणूनच, देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, अजिबात संकोच न करता जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!