Google Ad
Editor Choice

प्रभाग क्रमांक ४१,४४, ४५,४६ मध्ये भाजप बाल्लेकिल्ला कायम राखणार कि विरोधक डोके वर काढणार ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : यंदा पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीपासून राजकीय चित्र पूर्णतः पालटले आहे.

त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार एवढे नक्की. एकेकाळी सख्खे मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि भाजप पक्ष आता कडवी दुश्मनी असल्यासारखे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी होते की नाही ही संभ्रम अवस्था आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक अटीतटीची होणार असून त्याकडे संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळाचे लक्ष लागणार आहे. दोन वर्षांवर लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने या निवडणुकीकडे अधिक गांभीर्याने पहिले जात आहे. या निवडणुकीत काही प्रभाग फार लक्षवेधी असतील. त्यात भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगवी, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव वॉर्ड क्रमांक ४१, ४४,४५ व ४६ चाही समावेश असेल.

Google Ad

पिंपळे गुरवमधील प्रभाग ४६ मध्ये एक खुला, एक एससी, दोन महिलांचे आरक्षण पडले आहे. चार सदस्यांचा एकमेव प्रभाग खुल्या जागेतून चुरस अधिक असेल. यामुळे अनेकांची अडचण झाली. तर प्रभाग ४१ मध्ये जोरदार रस्सीखेचमुळे अनेकांना घरी बसण्याची वेळ येणार आहे. खुल्या जागेवर मोठी चुरस असेल एससी, एसटी महिलांना संधी असलेला एकमेव प्रभाग तर प्रभाग ४४ मध्ये खुल्या जागेसाठी चुरस वाढेल
एससी व एसटी महिला उमेदवार शोधावे लागतील
नवीन महिलांना संधी मिळू शकते. तर प्रभाग ४५ मध्ये तिन्ही जागा खुल्या (१ महिला ,२ खुल्या) खुल्या जागांवर पुरुषांना संधी झाल्याने चुरशीची लढाई पाहायला मिळणार!

चिंचवड चे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचे निवासस्थान असलेल्या पिंपळे गुरव-नवी सांगवी व सांगवी या भागात भाजपचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा होऊन बालेकिल्ल्यातील हे प्रभाग आपल्याच ताब्यात भाजप कसा ठेवतो, कि प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी डोके कसे वर काढतो, हे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.

तसेच प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ०७ जुलैला प्रसिद्ध केली जाईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!