Google Ad
Celebrities Editor Choice

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिलेदारांपैकी एक , कै . रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे , यांच्या ६१ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सन्माननीय सदस्य श्री.अनिल तोरणे यांचे वडील, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिलेदारांपैकी एक, ज्यांनी ‘पुंडलिक’ हा चित्रपट बनवला, अशे दिग्गज दिग्दर्शक निर्माते कै. रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे, यांच्या १९ जानेवारी २०२१ या दिवशी ६१ वी पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयामध्ये त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. या वेळी कै. दादासाहेब तोरणे यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे पुत्र श्री. अनिल तोरणे व त्यांची पत्नी मंगला तोरणे हे उपस्थित होते. अ.भा.म.चि. महामंडळाचे मा.अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी आदरांजली वाहिली, त्यांनतर अ.भा.म.चि. महामंडळाचे मा. खजिनदार श्री.संजय ठुबे, समिती सदस्य श्री.अनिल गुंजाळ, महामंडळाच्या सातारा येथील शाखा प्रमुख श्री. महेश देशपांडे, दादासाहेबांवर आधारित पुस्तक ज्यांनी लिहिले श्री. शशिकांत किणीकर, दादासाहेब तोरणे यांचे कुटुंबीय व उपस्थित सभासद कलावंत यांनी ही दादासाहेबांना आदरांजली वाहिली. उपस्थित मान्यवरांनी दादासाहेबांच्या कर्तुत्वाला व आठवणींना उजाळा दिला.

चित्रपटसृष्टीतील कर्तृत्ववान पुण्याचे रहिवासी दादासाहेब तोरणे यांनी तयार केलेला ‘पुंडलिक’ हा चित्रपट (मूकपट) १८ मे, १९१२ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला. नंतरच्या काळात त्यांनी पुण्यातून ‘सरस्वती सिनेटोन’ या चित्रसंस्थेतर्फे २० दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. जयश्री, शाहू मोडक, रत्नमाला, दादा साळवी, शांता आपटे, दिनकर कामण्णा आदी कलावंतांना पदार्पणाची संधी दिली. पहिली दुहेरी भूमिका ‘औट घटकेचा राजा’त सादर केली. पहिला रौप्यमहोत्सवी ‘शामसुंदर’ चित्रपट ‘सरस्वती सिनेटोन’चाच होता. ते वितरक, उत्कृष्ट संकलक होते आणि मूक पटांच्या काळात त्यांनी ऑडिओ स्टुडिओ पुण्यात सुरू केले होते.

Google Ad

दरवर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात दादासाहेब तोरणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पारितोषिक सुरू करावे, महाराष्ट्र शासन सिने क्षेत्रातील अनेक उपक्रम, संग्रहालय आहेत, अवॉर्ड आहेत त्यात त्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांची स्मृती जतन करावी अश्या मागण्यांचे पत्र त्यांच्या कुटुंबीयांनी संस्थेचे मा.अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांचेकडे दिले. अ.भा.म.चि. महामंडळाचे मा.अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी कै. दादासाहेब तोरणे यांच्या कर्तुत्वाला व ध्येयाला स्मरण करून, व्यक्त केलेल्या मागण्या शासन दरबारी मांडून त्यांचा पाठपूरावा करण्याचे आश्वासन दिले व त्यांचे अभिवादन केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!