Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीचे भाजपने केले खंडन … ‘फडणवीस’ म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे महापालिकेत पद न मिळाल्याने भाजपच्या 19 नगरसेवकांमध्ये नाराज असल्याचे चित्र आहे. 19 नगसेवक बंडाच्या तयारीत असून महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र पसरली आहे. तसेच भाजपचे 19 नगर सेवक अजित पवराच्या संपर्कात आल्याची चर्चा होत आहे.

पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं. भारतीय जनता पक्षाचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मोठी इनकमिंग भारतीय जनता पक्षात झाली होती. परंतु यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या चर्चांना अफवा असल्याचं सांगत खंडन केले आहे.

Google Ad

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपामध्ये नगरसेवक नाराज असल्याची चर्चा फक्त पत्रकारांमध्येच आहे. कोणीतरी पुड्या सोडत चुकीच्या बातम्या पसरवत आहे. भाजपा सोडून कोणीही जाणार नाही, तर इतर पक्षातून भाजपामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, मात्र भाजपाने ही सत्ता उलथवून लावत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला होता. पुणे महापालिका हातातून गेल्याची खंत अजित पवार अनेकदा बोलून दाखवतात.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!