Google Ad
Editor Choice

सोरतापवाडीचे उपसरपंच’ देणार आरोग्य केंद्रासाठी ‘१० गुंठे’ पर्यंत स्वमालकीची जागा … दातृत्वाच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक …!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन जवळ असलेल्या ग्रामविकासावर वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सोरतापवाडी ग्रामपंचायतीला या गावचे उपसरपंच शंकर कड यांनी उपआरोग्य केंद्राला स्वमालकीची १० गुंठेपर्यंत जमीन देऊ करण्याची घोषणा केली आहे. या तयारीने ग्रामपंचायतीचा उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

उपसरपंच शंकर कड, त्यांचे बंधू उद्योजक विकास कड व प्रल्हाद कड या भावंडांनी घेतलेल्या या भूमिकेचे समाजात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. साधारण गावातील गुंठ्याचे भाव बघता, १ कोटी रुपये किमतीची जागा दान करण्याच्या दातृत्वाची भूमिकेचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Google Ad

दरम्यान आरोग्य केंद्राला १० गुंठेपर्यंत जागा दान स्वरुपात देणाऱ्या कड कुटूंबियांचे सामाज कार्य पिढीजात आले आहे. या कुटूंबाने यापूर्वी गावातील पुरोगामी विद्यालयात वर्ग खोल्या, संस्थेस भरीव मदत अशा स्वरुपात मदत केली आहे. या कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते स्व. कुंडलिक आप्पा कड यांचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ऋणानुबंध राहिले आहे.

कुटूंब प्रमुख म्हणून कुंडलिक आप्पा कड, ज्ञानोबा उर्फ माऊली कड या बंधूंनी एकत्र बांधलेली ‘एकत्र कुटूंब पद्धती’ हि तालुक्यात आदर्श कुटूंब म्हणून गणली गेली आहे. याच कुटूंबातील नवीन पिढीने आदर्शाचा पायंडा पुढे चालविला आहे.

यापुढील काळात सर्व सहका-र्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत मुख्य जनतेच्या प्रश्नांना आणि आरोग्याला प्राधान्य देणार आहे. ग्रामपंचायतीचा विकास मॉडेल करण्याचा आमचा प्रयत्न आहे”

शंकर कड – उपसरपंच सोरतापवाडी.

सोरतापवाडी ग्रामपंचायतीला पुणे जिल्हा परिषदेचा आर. आर. पाटील स्मार्ट व्हिलेज (सुंदर गाव ) योजनेच्या वर्ष २०२१ – २०२२ या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आणि जिल्ह्यातील तालुकानिहाय गावांच्या निवडीत शहरीकरणाने झपाट्याने वाढ झालेल्या हवेली तालुक्यात सर्व आव्हानांना सामोरे जाणाऱ्या या ग्रामपंचायतीला तालुक्यात स्मार्ट व्हिलेज पुरस्काराही मिळाला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!