Google Ad
Editor Choice

निर्दोष मृत व्यंकटेश ला न्याय मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड युवा सेना मैदानात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : ऐन दिवाळीच्या काळात डोकडे कुटुंबीयांवर काळाचा घाला घातला सुट्टीमुळे गावी आलेल्या व्यंकटेश डोकडे या चिमुकल्याचा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नाहक बळी गेला. सदर घटना उलटून जवळपास एक महिना होत असून अद्याप त्या निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.यावरून असे लक्षात येते की प्रशासन या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत त्यांची पाठराखण करत आहे.

तरी या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी पिंपरी चिंचवड युवा सेना शहरप्रमुख श्री विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर आमरण उपोषण करणार असून चिमुकल्या निर्दोष व्यंकटेशला न्याय मिळवून देण्यासाठी पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके,चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, युवासेना शहर सनमवक रुपेश कदम, युवा सेना शह र संघटक राजेंद्र तरस, निखिल येवले,ओंकार विनोदे, सागर बारणे,केदार चासकर, मंदार येळवंडे, रोहित माळी, नितीन पाटील, अविनाश जाधव, आशिष बाबर, सलमान सय्यद पटेल, निजाम शेख,विशाल भातआंब्रेकर,संग्राम धायरीकर, युवती सेनेच्या शर्वरी जळमकर, मनाली कुटे उपोषणास उपस्थित राहणार आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!