Google Ad
Editor Choice Maharashtra

पोलिसांचा असाही चेहरा … पुणे शहर पोलिसांच्या १९९५ च्या बॅचचे व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून देशसेवा करत अनोखे सेवाकार्य …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२जून) : कधीकधी अशी काही छायाचित्रे सोशल मीडियावर समोर येतात ज्यांना पाहून आपले मन आनंदित होते आणि आपल्याला वाटतं की अजून तरी माणुसकी जिवंत आहे. अशीच काही छायाचित्रे आहेत जी आपल्याला माणुसकीची शिकवण देतात त्यातीलच एक पुणे शहर पोलीस १९९५ बॅच …

या बॅच मधील नरेंद्र राजे पोलीस हवालदार, हे सध्या चिखली पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालय मधील यांनी सन २०१५ मध्ये व्हाट्सएपचा ग्रुप तयार केला व ते आज तो पर्यत बॅचच्या सहकार्यातुन विविध उपक्रम म्हणजे , त्यांचे बॅच मधील कोण बॅचमेट मयत झाल्यास , त्यांचे कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाते , एखादा बॅचमेटला जर एखादा मोठा आजार झाला तर हे त्यास आर्थिक मदत करतात. त्यातुन मागील वेळी कोल्हापुर येथे महापुर आला तेव्हा नाना पाटेकर यांचे संस्थेस बॅच तर्फे एक लाखाचा धनादेश देण्यात आला आहे.

Google Ad

मागील दोन वर्षापुर्वी यांतील काही बॅचमेट यांनी एकत्र येऊन नसरापुर येथे स्वतः जाऊन वक्षारोपन कार्यक्रम केला आहे , आणि आता या वर्षी भरती होऊन २६ वर्ष पुर्ण झाले , परंतु यावर्षी कोरोना या महाभयंकर रोगाच्या साथीमुळे या बॅच ने वर्गणी काढुन दिनांक ०१ जून २०२१ रोजी काही बॅचमेट यांनी एकत्र येऊन कोरोनाचे गांभीर्य ठेवुन सोशल डिस्टंसिंग, सॅनीटाईज व मास्क याचा वापर करुन पुण्यामध्ये विविध ठिकाणी अन्नदानाचे वाटप , गरीब गरजूंना किराणा धान्य किट वाटप करुन , हडपसर येथील मा.सिंधुताई सपकाळ यांचे अनाथ आश्रम हडपसर येथे जाऊन त्यांना समक्ष भेटुन बॅच तर्फे किराणा धान्य देण्यात आले. देशाची सेवा बजावत असताना या पोलिसांनी केलेल्या या समजकार्याचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

आम्ही जिवंत आहोत, कारण खरचं माणुसकी अजून जिवंत आहे, “तुमचा गर्व आहे आम्हाला, शाब्बास पुणे पोलिस”

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!