Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

खासदार ‘श्रीरंग बारणे’ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी फी कमी करण्याबाबत मास्टर माइंड शाळेला दिले निवेदन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०८जून) : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांश शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे ज्या साधनांचा, सुविधांचा विद्यार्थ्यांनी उपयोग केला नाही, अशा खर्चावरचे १५ टक्‍के शुल्क कमी करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानमधील याचिकेवर दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र शासनानेही शाळांनी शुल्क कमी करण्याबाबतचे आदेश काढण्याची मागणी होत आहे. करोनाकाळात अनेकांचे रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीची वेळी आली आहे. त्यामुळे ‘शाळेची फी कशी भरायची’ हा मोठा प्रश्‍न पालकांसमोर उभा आहे. या लॉकडाऊन काळात पालकांच्या ही हाताला काम नाही अशा परिस्थितीत मुलांची संपूर्ण फी भरणे पालकांना अवघड आहे, त्यामुळे या संकट काळात शाळांनी फीमध्ये अधिकची सवलत द्यावी, अशी मागणी मास्टर माइंड स्कूल मधील दापोडी, सांगवी, पिंपळे गुरवच्या काही पालकांनी सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेनेच्या पदाधिकारी सुषमाताई शेलार यांच्याकडे केली.

Google Ad

पालकांच्या या तक्रारीची त्वरीत दखल घेत सुषमाताई शेलार यांनी खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्याशी चर्चा केली, आणि शिवसेना महिला आघाडी स्वरूपाताई खापेकर, सरिताताई साने, शैला निकम, शैला पाचपुते, सुषमा शेलार, सहकारी कार्यकर्ते संतोष रजपूत, विकास मोरे, राहून जाधव, व पालक वर्ग यांच्या कडून मास्टरमाइंड स्कूल ला भेट देऊन शाळेची फी कमी करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापणानेही आपल्या मागणीचा जरूर विचार करू असे आश्वासन शिवसेना पदाधिकारी व पालकांना दिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!