Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘शिवाजी पाडुळे’ यांनी कोरोनाच्या संकट काळात नवी सांगवी, पिंपळे गुरव मधील हतबल रिक्षावाले काकांना … किराणा देऊन दिला मानसिक आधार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जून) : कोरोनाचा संकट काळ सुरु होऊन दीड वर्ष लोटले. या दिड वर्षांपासून शालेय विद्यार्थी वाहतुक बंद असल्याने रिक्षावाले व स्कुलव्हॅनवाले काका यांची अवस्था अतिशय हालाखीची झाली आहे. सांगवी पिंपळेगुरव परीसरातील या हतबल काकांना परिस्थितीची जाणीव ठेवून माजी स्वीकृतनगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगवी पिंपळेगुरव ब्लॉकचे अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांचे वतीने आपल्या घासातला घास – म्हणून संपूर्ण किराणा साहीत्य देवून या गरजूंना मानसिक आधारा देवून ,या कठीण काळात मदतीचा हात दिला. कोरोनाच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आणि त्यांच्या कुटूंबियांना होम आयसोलेशेन मध्ये असताना घरपोच जेवण देण्याचे सामाजिक कार्यसुद्धा पाडुळे कुटूंबियांकडून करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवाजी पाडुळे यांनी, “मी व माझे जिवलग सहकारी आपल्या सुखदुःखात भक्कमपणे तुमच्या सोबत आहोत हा विश्वास दिला”…

यावेळी रिक्षावाले काकां सह सातारा जिल्हा मित्र मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष मुख्याध्यापक शिवाजी मानेसर, सोमनाथ कोरे, आबासाहेब चव्हाण उपस्थित होते. रिक्षावाले काकांचा मानसिक भार हलका करून, बळ देण्यासाठी मुख्याध्यापक शिवाजी माने आणि शिवाजी पाडुळे यांनी काही भावस्पर्शी गीते सादर केली…

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!