Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

इस्राईलच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जुलै) : मुंबई येथील इस्राईल दूतावासाच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. इस्राईलचे महावाणिज्य दूत याकोव्ह फिन्केलस्टेन यांच्या नेतृत्वाखाली  असलेल्या या शिष्टमंडळा मध्ये   अर्थ आणि व्यापार खात्याचे  प्रमुख सागी इचर, अर्थ आणि व्यापार खात्याच्या व्यापार अधिकारी पर्लिनी वाठोरे यांचा समावेश होता. शिष्टमंडळाचे स्वागत महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

यावेळी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, जलनिःसारण तसेच पर्यावरण आणि अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, सीटीओचे राजा डॉन, पंकज लोंढे निलेश जैन आदी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!