Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्कींग प्रारंभ … अशी असेल पार्किंग ठिकाण आणि पार्किंग पॉलीसी – फेज १ पार्किंगच्या जागांची यादी जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि . १ जुलै २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरातील वाहन पार्किंग धोरणाच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीला आजपासून प्रारंभ झाला . पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ८० जागांचा समावेश आहे . महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला . पिंपरी येथील सिट्रस हॉटेल समोरील जागेत सशुल्क वाहनतळ करण्यात आले आहे .

या ठिकाणी कार्यक्रमाचे औपचारीक आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास आयुक्त राजेश पाटील , उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले , अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर , अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप , सहशहर अभियंता श्रीकांत सवणे , कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे , बापु गायकवाड आदी उपस्थित होते . वाहनतळाच्या ठिकाणी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी शुल्क भरुन आपले वाहन पार्क करुन वाहन पार्कीग धोरणाचा शुभारंभ केला .

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली आहे . यात १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकुण ४५० पे अँड पार्कची ठिकाणे आहेत . यातील सुमारे ८० जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे . पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

नागरिक व वाहन चालकांच्या माहितीस्तव शहरातील पार्किंग ठिकाणांची यादी महापालिकेच्या

http://www.pcmcindia.gov.in

या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे . नो पार्किंग ठिकाणांची यादी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय ( वाहतुक विभाग ) प्रसिध्द करणार आहे .

असे असेल पार्किंग ठिकाण आणि पार्किंग पॉलीसी

फेज १ पार्किंगच्या जागांची यादी :-

Google Ad

About the author

Maharashtra14 News

58 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!