Google Ad
Editor Choice Sports

मॅरेथॉन एक सामाजिक बांधिलकी : रविवारी हाफ मॅरेथॉनमध्ये धावले हजारो पिंपरी चिंचवडकर … शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि उन्नती फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ डिसेंबर) : रविवारी दि.०५/१२/२०२१ रोजी पिंपळे सौदागर या ठिकाणी “पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन” चे आयोजन करण्यात आले होते. या “पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन” चे आयोजन किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि , नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन व उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच यशदा रियालिटी ग्रुप , यांच्या सहकार्याने उद्योजक मा.विजयशेठ पांडुरंग जगताप तसेच आयोजक  नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून सुरू करण्यात आले.

हे हाफ मॅरेथॉनचे स्वरूप २१किमी,१०किमी आणि ०५ किमी अश्या तीन वेगवेगळ्या श्रेणीत होते. या मॅरेथॉन मध्ये २५०० स्पर्धकांचा सहभाग होता.

Google Ad

पिंपळे सौदागरमध्ये प्रभागातील नागरिकांसाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपल्या नावीन्यपूर्ण विचार शैलीने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक , अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा वारसा पुढे नेला आहे आणि यावेळी या हाफ मॅरेथॉनचे आयोजन करून आपल्या प्रभागातील नागरिकांना आणखीन एक वेगळेपण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

गेल्या दोन वर्षात एका महामारीने शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे . सुदृढ शरीर व सक्षम मन बनविण्यासाठी धावणे हा एक उत्तम व दर्जेदार व्यायाम आहे . केवळ खेळ म्हणून किंवा स्पर्धा म्हणून मॅरेथॉन नाही तर आपल्यातील सर्वांगीण बदलाची क्षमता धावण्यात आहे. आरोग्य, मानसिकता , स्वभाव , सवयी या साऱ्याच बाबींचा सकारात्मक सराव धावण्यामुळे होतो. ही एक सक्षम आणि सुरक्षित आरोग्य साखळी आहे.

तरुण-तरुणींपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वच वयोगटातील रनर्सचा या हाफ मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.तरुणांनाही लाजवेल असा उत्साह असलेले ज्येष्ठ नागरिक या मॅरेथॉनमध्ये आले होते. अगदी नाचत, धावत हे ज्येष्ठ नागरिक आपल्या वयाचा विचार न करता मॅरेथॉनचा आनंद घेताना दिसले.

“पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन” मध्ये सहभाग घेणाऱ्या रनर्स ला टि-शर्ट , सर्टिफिकेट , मेडल , गुडल बॅग देण्यात आले तसेच या “पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन” स्पर्धेत २१किमी श्रेणीतील जिंकणाऱ्या पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे १०,०००₹ , ७५००₹ व ५०००₹ तसेच १०किमी श्रेणीतील जिंकणाऱ्या पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे ७५००₹ , ५०००₹ व ३०००₹ आणि ०५ किमी श्रेणीतील जिंकणाऱ्या पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे ५०००₹ , ३०००₹ व २०००₹ अशी रोख बक्षीसे देण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!