Google Ad
Editor Choice

चिंचवडचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी केली २४ तासांच्या आत आश्वासनाची पूर्तता …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ डिसेंबर) : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन वेळच्या जेवणाची संपूर्ण जबाबदारी आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी स्वीकारली आहे.

तसेच आंदोलनात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी जीवनावश्यक किराणा सामग्री किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका उषा मुंढे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, बाला शुक्ला, शिवाजी कदम, यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.

Google Ad

चिंचवड विधानसभेचे आमदार मा. श्री. लक्ष्मण भाऊ जगताप यांनी वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांशी रविवारी संवाद साधला होता. त्यांनी आंदोलनाची स्थिती आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत सर्व आंदोलक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवण्याची जबाबदारी आपली जबाबदारी म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वीकारली होती. अवघ्या २४ तासातच सोमवारी सकाळी अकरा वाजता येथील आंदोलनातील २०० एसटी कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी जीवनावश्यक किराणा सामग्री किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आंदोलनातील एसटी कर्मचारी यांनी आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगरसेविका उषा मुंढे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, बाला शुक्ला, शिवाजी कदम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे याप्रसंगी आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!