Google Ad
Editor Choice

दापोडी गावचा यावर्षीचा फिरंगाई देवीचा उत्सव रद्द … सामाजिक भान जपत राबविली कोविड-१९ तपासणी मोहीम!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक महामारीचे संकट व वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दापोडी गावचे ग्रामदैवत फिरंगाई देवी उत्सव समितीच्या वतीने यावर्षीचा होणारा फिरंगाई देवीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. फिरंगाई देवी ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक विचारांचा वारसा जपत समिती, ग्रामस्थ, विश्वस्त तसेच स्वीकृत नगरसेवक अनिकेत काटे यांनी कोरोना तपासणीची मोहीम राबविली. यावेळी दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील नागरिकांसाठी महापालिकेच्या सांगवी येथील वैद्यकीय विभागाकडून मोफत रॅपिड अँटिजन टेस्टचे आयोजन करण्यात आले होते.

दापोडी येथील ग्रामदैवत फिरंगाई देवी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समितीच्या वतीने तसेच स्वीकृत नगरसेवक अनिकेत काटे यांच्या संयुक्त विद्यमाने माता शितळादेवी चौक येथे कोरोनाच्या रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणीची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, कचरा वेचक घंटा गाडीचे कर्मचारी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसरातील नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Google Ad

याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी विरोधी पक्ष नेते राजेंद्र काटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम राबवित असताना महापालिकेच्या सांगवी येथील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, डॉ. सचिन लकडे, डॉ. अंकिता वाघमारे, लॅब टेलनिशियन आदी टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. ही मोहिम यशस्वी करण्याकरिता भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई चेतन साळवे, एन झेड रोकडे यांनी मदत केली. तसेच आशिष काटे, श्रीकांत कांबळे, विनोद शिवशरण, अमर कनप, अनिल कांबळे, अमित काकडे, दिपक काटे, आदेश काटे, मंगेश मोरे, नितीन बोधे, चिराग काटे, योगेश परब, दिपेश बाफना यांनी ही माहीम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

या मोहिमेत दिवसभरात एकूण २८४ नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. ११ जण बाधित रुग्ण पॉझिटिव्ह आले, अशी माहिती वैद्यकीय विभागाकडून मिळाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!