Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीच्या स्मशानभुमीत कोरोनाच्या काळात देवदूतांप्रमाणे सेवा देणाऱ्यांना … महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरक्षा कवच!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५एप्रिल) : सांगवीच्या गॅस शवदाहिनीत आणि स्मशानभुमीत सध्या कोरोनाच्या काळात अनेक महिण्यापासून आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र २४ तास देवदूतांप्रमाणे काम करणारे ॲापरेटर, कामगार, वॅाचमन इत्यादी याच्याकडे कोणाचेही लक्ष नाही, हे लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगवी शाखेकडून त्यांच्या सुरक्षेसाठी हॅंडवॅाश, सॅनिटायझर, फ्लोरिंग सॅनिटायझर, फेस मास्क, हॅंडवॅाश पंप, सर्जिकल हॅडग्लोज, पी पी ई किट व अन्य सूरक्षा कवच जर ॲापरेटर कोरोना बाधित झालेतर गॅस दाहिनी बंद ठेवावी लागेल याची त्वरित खबरदारी घेऊन आज दि.२५/४/२०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता सांगवी स्मशानभूमीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

मागिल वर्षी देखिल मनसेच्या वतिने कामगारांना सेफ्टी सुरक्षा देण्यात आली होती व अन्य काही मदत लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावे अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी दिली आहे.
यावेळी मनसेचे मंगेश भालेकर उपविभाग अध्यक्ष, गणेश माने, साईराज भोसले,महेश केदारी इत्यादी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!