Google Ad
Editor Choice

रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा ; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : ओबीसी आरक्षणावरुन राज्यात रखडलेला निवडणूक कार्यक्रम एका आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत.

आज (०४ मे) सकाळी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने केलेला कायदा याबाबत सुनावणी झाली . मात्र राज्य शासनाने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात न टिकल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती खानविलकर व अभय ओक यांनी आठवडाभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे आदेशच निवडणूक आयोगाला दिले आहेत .

Google Ad

राज्य शासनाने नव्याने प्रभागरचनेसंदर्भात केलेल्या कायद्याच्या विरोधात जवळपास १२ जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे २० महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .

आत्ता होणाऱ्या निवडणूका या ओबीसी आरक्षणाशिवाय  होणार आहेत . त्यामुळे राज्य सरकारसह सर्व राजकीय पक्ष आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!