Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे ११७ कोटी रुपये खर्चास स्थायी समितीने दिली मान्यता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ जानेवारी २०२२) : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे ११७ कोटी रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली.

            महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

Google Ad

मागील दहा वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे शहरी भागासह समाविष्ट गावांमध्ये देखील नागरीकांना पाणी समस्याचा सामना करावा लागत आहे. सन २०५० पर्यंत वाढणा-या लोकसंख्येचा विचार करुन पाणी पुरवठा नियोजन करण्यात आले आहे. यासाठी भोसरी, मोशी, चिखली, थेरगाव, विशाल नगर पिंपळे निलख भागांमध्ये सात उंच पाण्याच्या टाक्या आणि पंप हाऊस उभारण्यासाठी ६३ कोटी ९१ लाख रुपयांच्या विकासकामांसह ११७,०१,९०,५७७ रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी देण्यात आली अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी दिली.

     या बैठकीत विषय पत्रिकेतील ३५ आणि ऐनवेळचे १४ अशा एकूण ४९ विषयांना मंजूरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पुढील टप्प्यात भामा – आसखेड आणि आंद्रा पाणी पुरवठा प्रकल्पातून २६३ एमएलडी पाणी मिळविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी चिखलीमध्ये जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच चिखली आणि रावेत येथील जलशुध्दीकरण प्रकल्पातून शहराच्या विविध भागात पाणी पोहचविण्यासाठी मुख्य नलिका टाकणे आणि सात उंच पाण्याच्या टाक्या तसेच एक पंप हाऊस उभारणे व कार्यान्वित करणे (पॅकेज – ३) या कामास मंजूरी देण्यात आली. यामध्ये थेरगाव (३ द.ल.ली.), लक्ष्मणनगर – २ (२.५ द.ल.ली.), न्यू संत तुकाराम नगर (२ द.ल.ली.), बो-हाडे वाडी (२.५ द.ल.ली.), चिखली mbr (३ द.ल.ली.), सावित्रीबाई फुले उदयान (३ द.ल.ली.), सेक्टर १२ (१.५ द.ल.ली.), आश्रम शाळा (२ द.ल.ली.), भोसरी भाजी मंडई (२ द.ल.ली.) या ठिकाणी उंच पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे.

तसेच चिखली जलशुध्दीकरण केंद्र ते सेक्टर ७ – १० पर्यंत ११०० मि.मी. व्यासाची माइल्ड स्टीलची ६ किमी. पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. तसेच मोशी येथील नविन आरटीओ शेजारी पाण्याच्या टाक्यांमधून मोशी भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी ७ किमी. पाण्याची पाईप लाईन टाकणे. या प्रकल्पातील मुख्य वाहिनीची लांबी १३.८ किमी. असेल. तसेच दिघी येथील सर्व्हे नं. ७२, ८४, ६९, ८० मधून जाणारा डिपी रस्ता विकसित करण्यासाठी ३,१५,३९,८०४ रुपयांच्या कामास मंजूरी दिली. तसेच नियोजित जलउपसा केंद्र निघोजे – तळवडे व जलशुध्दीकरण केंद्र चिखली येथील प्रकल्पांकरीता उच्चदाब वीजपुरवठा करणे २२ केव्ही भुमिगत वीज वाहिनी टाकणे यासाठी ३,९८,६८,८४५ रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील स्थापत्य विषय कामासाठी ४४,७९,६७७ रुपयांच्या कामास तसेच प्रभाक क्र. २६ विशालनगर डिपी रोड लगतच्या रस्त्यांच्या कामासाठी ५६,०९,२७३ रुपये, कस्पटे वस्ती, शेक वस्ती परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ५६,२४,१५६ रुपये, प्रभाग क्र. २८ रहाटणी परिसरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ४९,८२,६६५ रुपयांच्या कामास मंजूरी देण्यात आली. थेरगाव येथील बोट क्लबच्या नुतनीकरणासाठी ७५,७३,४०९ रुपये आणि बोपखेल येथील मनपाच्या आरक्षीत जागेत उद्यान विकसित करण्यासाठी १,५४,३४,८६४ रुपयांच्या कामासही स्थायी समितीने मंजूरी दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!