Google Ad
Editor Choice

पुणे विद्यापाठीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका … सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका बसला आहे. आतापर्यंत विद्यापीठातील सहा कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. या विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी अनेक प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय सुरक्षित होते. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये शासनाचे आदेश येईपर्यंत विद्यीपाठातील कामकाज जवळपास पूर्ण क्षमतेने सुरू होते. त्याच काळात अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. विद्यापीठातील जे कुटुंब बाधित झाले आहे त्यांच्यासाठी गेस्ट हाऊसमधील रूम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

67 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!