Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आता देणार ८००० रुपये

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक लाकुड/सरण उपलब्ध करण्या करिता प्रति मृतदेह र.रु. ६,०००/- याप्रमाणे संबंधित काळजीवाहक संस्थांना देण्यास मनपा सभेत मान्यता देण्यात आलेली होती.

तथापी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मा. स्थायी समिती यांनी प्रति मृतदेह आणखी र.रु. २,०००/- वाढ म्हणजे प्रति मृतदेह एकुण र.रु.८,०००/- देण्यास मान्यता दिलेली आहे.

Google Ad

तरी सर्व संबंधित काळजीवाहक संस्था यांना कळविण्यात येते की, कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाकुड/गोवऱ्या इ. उपलब्ध करुन देण्यासाठी पैसे घेतले, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येवुन, संस्था ब्लॅकलिस्ट केली जाईल याची नोंद घ्यावी. असे आरोग्य वैद्यकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!