Google Ad
Editor Choice Pune

मनसेच्या पुणे पदवीधरच्या उमेदवाराला धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या … कोण आहे, साताऱ्याचा हा युवक!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी साताऱ्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतले. मोहन अंबादास शितोळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो एक जोगता असून भिक्षा मागून आपली गुजराण करतो.
काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांना हा धमकीचा फोन आला होता. ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करु नकोस’, अशा भाषेत पाटील यांना धमकी देण्यात आली होती.

Google Ad

यानंतर रुपाली पाटील यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या घटनेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली होती. ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असे राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितले होते. तेव्हापासून खडक पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी रुपाली पाटील यांना आलेल्या मोबाईल क्रमांकाचा तपशील जमवण्यास सुरुवात केली. हा तपशील आल्यानंतर पोलिसांना शितोळे याच्या पहिल्या पत्नीचा शोध लागला.

तिच्याकडून पोलिसांना मोहन शितोळेचे आणखी पाच-सहा मोबाईल क्रमांक मिळाले. यापैकी एका मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरुन पोलिसांनी मोहन शितोळे याला कराडच्या ओगलेवाडी येथून ताब्यात घेतले. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. पुणे शहरातील मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असतात.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!