Google Ad
Editor Choice

एसटीचा संप सुरूच, रेल्वेचं आरक्षण फुल्ल, खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी, प्रवाशांचे हाल आणि लूट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८नोव्हेंबर) : पिंपरी- चिंचवडमधील वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनीही संपला सुरुवात केली आहे. संपामुळे जवळपास 49 बसेस आगारातच उभ्या आहेत. कर्मचाऱ्यांनी पुकारलेलया संपामुळे आगारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची गर्दी झाली आहे. दिवाळीच्या सुटयांहून परत निघालेल्या प्रवाश्यांचा मोठा खोळंबा झाला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीकरण करावे.  या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. पुण्यात मध्यरात्री 12 पासून संपाला सुरुवात झाली.  तर सकाळ पासून पुण्यातून एसटीची वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने सोमवारी (आज) मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. परंतु बैठकीतील निर्णयावर अवलंबून न राहता एसटी कर्मचाऱ्यांनी संपाला सुरूवात केली आहे. शहरातील स्वारगेट , शिवाजीनगर या मुख्य एसटी डेपोसह आणखी तीन डेपोमधील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासून कर्मचाऱ्यांनी  डेपोतच बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांचे मोठे हाल झाले आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर कामावर परतणाऱ्या चकारमान्यानाही त्याचा फटका बसला आहे.

Google Ad

तिकिटाचे ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. संपामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या असल्यातरी तिकिटांचे ऑनलाईन व ऑफलाईन बुकींग केलेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळत आहेत. स्वारगेट बस स्थानकातून आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत देण्यात आले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एकट्या स्वारगेट डेपोतून जाणारी 200 एसट्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. या डेपोमधून जवळपास 136 चालक आणि 128 वाहक संपात सहभागी झाले आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये आगार प्रशासन सहभागी नसल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. मात्र जो पर्यंत कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय होता नाही. आमच्या मागण्या मान्य होता नाहीत तोपर्यंत एकही एसटी डेपोच्या बाहेरा पडणार नसल्याची भूमिका आंदोलनात सहाभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!