Google Ad
Editor Choice

नवी सांगवीतील या भागात स्ट्रॉम वॉटर चेंबर मधून साप आले बाहेर … नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये दहशत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : माणूस आणि प्राण्यामधील मैत्री तुम्ही खूप वेळा बघितली असेल. ही मैत्री दर्शवणारे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. परंतु काही प्राणी असे असतात की त्यांच्याशी सहजपणे कोणी मैत्री करत नाही.यामधलं एक महत्त्वाच नाव म्हणजे साप.

पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी मधील समर्थ नगर ( टन्नू शाळे शेजारी) येथे या आठवड्यात अनेक वेळा मनपाच्या स्ट्रॉम वॉटर चेंबर मधून साप आल्याचे नागरिकांच्या दृष्टीस पडत असल्याने शाळेतील मुले पालक आणि आजूबाजूच्या नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Google Ad

आता हे असेच अनेक साप विषारी आहेत का कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे? नागरिकांनी सर्प मित्रांना बोलवून हे साप त्यांच्या ताब्यात दिले आणि सध्या तरी सुटकेचा निस्वास सोडला. या वेळी बघ्यानी एकच गर्दी केल्याचे दिसत होते. परंतु असे सर्प अजून असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली, असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी चेंबरची स्वच्छता करून यावर कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!