Google Ad
Editor Choice

” मी मतदानासाठी येणारच ” ; चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा एकदा इतिहास घडवणार …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जून) : महाराष्ट्र राज्याची विधानपरिषद निवडणुक काही तासांवर येऊन ठेपल्या असताना सर्व पक्षांकडून एका एका मतासाठी प्रयत्न केले जात आहेत. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार असून भाजपचे पाच आणि महाविकासआघाडीचे सहा उमेदवार रिंगणात आहेत.

गुप्त मतदान असल्यामुळे आमदारांची फोडाफोडी होण्याची भिती आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले असून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हेसुद्धा विधानपरिषद निवडणुकांच्या मतदानासाठी जाणार आहे.

Google Ad

सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकात एका एका मतासाठी पळापळ सुरू असताना लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी हजर असणार आहेत. राज्यसभेच्या मतदानासाठी ते व्हील चेअर वरून हजर राहिले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या विजयानंतर हा विजय आमचा नसून आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर प्रकृतीमुळे विधानपरिषदेसाठी त्यांच्या मतावर प्रश्नचिन्ह होते. देवेंद्र फडणवीस यांनी “तुम्ही तुमची प्रकृती संभाळा, मत महत्त्वाचं नाही प्रकृती महत्त्वाची आहे.” असं म्हटलं होतं पण लक्ष्मण जगतापांनी “मी मतदानासाठी येणारच” असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ते उद्या मुंबईत मतदानासाठी हजर राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.

लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांच्या जाण्याचा निर्णय होईल असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या असं सांगितलं पण त्यांना नकार देत मी मतदानाला येणारच अशी भूमिका लक्ष्मण जगतापांनी घेतली आहे.

दरम्यान विधानपरिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार रिंगणात असून त्यांना तब्बल २२ मतांची गरज आहे. या सर्व मतांची जुळवाजुळव पक्षाकडून चालू आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मविआ आणि भाजप प्रयत्न करत आहे. दरम्यान भाजपकडून आजारी असलेले मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोघेही मतदान करण्यासाठी हजर राहणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!