Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीतील श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यासाचा नवीन सेवाभावी उपक्रम … भाविकभक्तांना आणि दानशुर दात्यांना मदतीचे आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९मे) : श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास , सांगवी , पुणे २७. यांनी कोवीड-१९ च्या काळामध्ये मागील वर्षाच्या मार्च महिण्यापासून अनेक समाजपयोगी कार्य केलेली आहेत. यामध्ये एप्रिल , मे व जून २०२० या तिन महिन्यात वाय.सी.एम. हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबीर आयोजित करून ५०० बॅग रक्त संकलन करुन दिले आहे .

एप्रिल , मे आणि जून २०२० मध्ये सलग तिन महिने २०० गरजू , कुटूंबांना महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले. तसेच मागील वर्षी कोरोना सुरवातीच्या काळात पंतप्रधान सहाय्यत्तानिधी साठी ५१००० / – हजार आणि मुख्यमंत्री सहाय्यत्तानिधी साठी ५१००० / – हजार रु . निधी दिलेला आहे .

Google Ad

सध्या सुरु असलेल्या कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेमध्ये न्यासाने नवीन उपक्रम सुरु केलेले आहेत . यात मंदिरासमोर कोरोना बाधीत रूग्णांची हॉस्पीटलमध्ये ने – आण करणाऱ्या सर्व वाहनांची विनामोबदला सॅनीटाईझींग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . सांगवीतील खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांना उपचारासाठी मदत होण्याकरिता बायपॅप व्हेंटी मशीन ०५ नग दिले आहेत . त्याद्वारे रुग्णांना हॉस्पीटलमधील बिलामध्ये त्या बेडसाठी १0 % सुट मिळेल अशी व्यवस्था न्यासाने केली आहे .

तसेच सांगवी गावात सुरु असलेल्या तीन्ही लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तींना दररोज चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे . सद्या उद्दभवलेली परिस्थिती पाहता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कुटूंबाचे कुंटूंब बाधीत होत आहे . त्यामुळे आता आपल्या म.न.पा.शी संलग्न होऊन होम कॉरनटाईन असलेले पेशंट यांना सकाळी विना मोबदला घरपोच जेवण तसेच फ्रन्ट लाईन वर्कर्स , लसीकरण केंद्रातील डॉक्टरर्स , नर्सेस व हॉस्पीटल स्टाफ यांना जागेवर जेवण देण्याचे न्यासाने सुरु केले आहे .

▶️ न्यासाचा नविन उपक्रम :-
सांगवी पंचक्रोशीतील रुग्णांना ने – आण करण्यासाठी अत्यल्प दरामध्ये अॅम्ब्यूलन्स सेवा पुरविण्याचा श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यासाचा मानस आहे . सध्याची परिस्थीती पाहता सदर उपक्रम त्वरीत कार्यान्वीत करण्यासाठी सर्व भाविकभक्तांना आणि दानशुर दात्यांना सढळ हस्ते मदतीचे आवाहन न्यास करीत आहे . ज्या दानशूर दात्यांची वरिल उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी न्यासाच्या खालील संबंधीत व्यक्तींशी संपर्क साधावा हि विनंती आणि आवाहन करण्यात आले आहे.

न्यासाचा फोन नं . 02027282021
श्री मधुकर हातळगे 9822500598
श्री नागेश बावस्कर 9822847973

Google Ad

About the author

Maharashtra14 News

473 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!