Google Ad
Editor Choice india

Delhi : मोठी घोषणा : या उपकरणावरील देण्यात आलेली IGST कर सूट ३१ ऑगस्टपर्यंत २०२१ पर्यंत वाढविण्यात आली … 

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यतेखाली ४३वी जीएसटी काउंसिल (GST Council) यांची बैठक पार पडली. जवळपास सात महिन्यांनंतर ही बैठक पार पडली. या बैठकीत राज्य, केंद्रशासित प्रदेशातील अर्थमंत्री आणि केंद्र आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘कोविड संबंधित उपकरणावरील देण्यात आलेली कर सूट ३१ ऑगस्टपर्यंत २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिसचे वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन यावर उपचार करिता वापरण्यात येणारे अॅम्फोटेरेसिनी बी (Amphotericin B) इंजेक्शनवरील कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे कर माफ असलेल्या वस्तुच्या यादीत हे इंजेक्शन सामील केले आहे. शिवाय कोविड संदर्भातील साहित्यांच्या आयातीवरील IGST सवलतीतही ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.’

Google Ad

जीएसटी काउंसिलची शेवटची बैठक ऑक्टोबरमध्ये झाली होती. त्यानंतर नियमानुसार फेब्रुवारीमध्ये बैठकी होणार होती, परंतु त्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होते. त्याच वेळेत देशातील काही राज्यांमध्ये निवडणूक होत्या आणि आचार संहिता लागू झाली होती. यामुळे फेब्रुवारी महिन्यात जीएसटीची बैठक पार पडली नाही.

राज्यातील नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जीएसटी काउंसिलची बैठक पार पडली. जीएसटी काउंसिल बैठकीबाबत दिल्ली सरकारचे मंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, ‘बैठकीत कोविड लस, ऑक्सिजन सिलेंडर, कॉन्सेंट्रेटर, ऑक्सिमीटर, पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, टेस्टिंग किट आदी कर मुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पंजाब, बंगाल, केरळ आदी अनेक राज्यांनी पण प्रस्ताव मांडला होता. परंतु भाजपच्या अनेक अर्थमंत्र्यांनी याचा विरोध केला.’

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!