Google Ad
Editor Choice

सुसंस्कारीत सक्षम पिढी निर्माण व्हावी याकरिता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नवी सांगवी येथे बालकांचे तालुकास्तरीय .… मूल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

‘संस्कार केले तर संस्कृती टिकेल,
संस्कृती टिकली तर धर्म टिकेल,
आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल…!!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ डिसेंबर) : आज दि.११ डिसेंबर २०२२ वार रविवार रोजी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नवी सांगवी येथील बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे एकदिवसीय मूल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळ सत्रात मुलांच्या बौद्धीक विकासासाठी उपयुक्त स्तोत्र-मंत्रांचे पठण व आध्यात्मिक सेवा घेण्यात आल्या.

बालसंस्कार काळाची गरज :-

आपली मुले हीच आपली खरी संपत्ती आहे बाल वयात मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे योग्य वळण लावणे यालाच तर म्हणतात संस्कार योग्य संस्कारामुळे विचार,बुद्धी, आचार, ज्ञान, कर्तुत्व गुणांचा उत्कर्ष होऊन जीवनाची प्रगती होते.या संस्कारांच प्रतिबिंब आपणास वागण्या-बोलण्यात राहणीमानात, नीटनेटकेपणात, आपणास दिसून येते.

Google Ad

लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा त्याला जसा आकार द्यावा तसेच तो घडतो म्हणून या बाल वयात योग्य ते विचार, संस्कार बिंबवणे खूप गरजेचे आहेत कारण बालवयात संस्कार झाले तरच ते मोठेपणी अंगवळणी पडतात.

मनाला विचारांची, विचाराला ज्ञानाची, ज्ञानाला सत्कर्माचे आणि या सर्वांना शेवटी बालोपसनेची जोड देणे हाच संस्कार, ह्याच बालमनावर संस्कार करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. हे ओळखूनच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नवी सांगवी येथील बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे एकदिवसीय मूल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये स्वामी समर्थ आणि गायत्री मंत्र तसेच स्मरणशक्ती वाढ होण्यासाठी श्री गणपती स्तोत्र, श्री सरस्वती स्तोत्र , प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि ऐक्याची भावना निर्माण व्हावी, याकरीता ऐक्यमंत्राचे पठण करून घेतले गेले.

तसेच वृक्षांचे महत्व,वृध्दाश्रम मुक्त भारत,महापुरुषांची चरीत्र यावर मार्गदर्शन करण्यात आले. योगा व स्वसंक्षणासाठी लाठी काठी प्रशिक्षण घेण्यात आले. नविन पिढी संस्कारक्षम होऊन व्यसनमुक्त होऊन सुसंस्कारीत सक्षम पिढी निर्माण व्हावी या परमपुज्य गुरुमाऊलींच्या संकल्पनेतुन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात ५०० हुन अधिक मुलांनी व सेवेकर्यांनी सहभाग घेतला होता. या साठी बालसंस्कार विभागाच्या सर्व टिम ने अथक परिश्रम घेतले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!