Google Ad
Editor Choice

कर्नाटक बिदर येथे ‘जागतिक मानवाधिकार दिन’ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने साजरा … महाराष्ट्रातील टीमचाही सहभाग!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .१० डिसेंबर) : समाजातील प्रत्येक व्यक्तीला जन्मताच काही हक्क प्राप्त झालेले असतात. प्रत्येकजण हा जन्मतः स्वतंत्र असतो. याशिवाय वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, दारिद्रय, जन्मस्थान इतर आधारांवर कोणाशीही भेदभाव होणार नाही, यासाठी विशिष्ट कायदे देखील अस्तित्वात आहेत.

समता, स्वातंत्र्य, शिक्षणाविषयाचे हक्क प्रत्येकासाठी आहेत. मानवाधिकांराविषयी समाजात जागृकता पसरावी, यासाठी संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी १० डिसेंबरला मानवी हक्क दिन साजरा केला जातो.

Google Ad

आज (दि.१० डिसेंबर) कर्नाटक बिदर येथे ‘जागतिक मानवाधिकार दिन’ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने श्री हौशिला प्रसाद दुबे – राष्ट्रीय प्रधान महासचिव, कुलदीप सिंह राष्ट्रीय ट्रेझरर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी मोहम्मद मिसबा अहमद अध्यक्ष-दक्षिण भारत, डॉ बेग , दादासो दराडे- अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, डॉ .देविदास शेलार – अध्यक्ष पुणे जिल्हा, ऍड. अस्विनी बोगम-प्रभारी, सुषमा भालेकर महिला उपाध्यक्ष पुणे जिल्हा तसेच विविध राज्यातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्यारक्तदान शिबिराचे आयोजन देखिल करण्यात आले होते.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष हौशिला प्रसाद दुबे – राष्ट्रीय प्रधान महासचिव म्हणाले, मानवाधिकार समितीचे मुख्य कार्य हे मानवाच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करणे हे असते. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत तक्रार दाखल करून चौकशी करणे व कारवाई करणे हे समितीचे प्रमुख कार्य आहे. बालविवाह, बालकामगार, कामगारांचे हक्क याकडे देखील मानवाधिकार लक्ष देते. स्त्रिया, कैदी यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी यासाठी देखील ihrjpc सरकारला सूचना देऊ शकते. थोडक्यात, मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी समितीकडून वेळोवेळी पावले उचलली जातात.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!